पेट्रोल पंपावर पैसे काढण्याची सुविधा

0
10

नवी दिल्ली, दि. १८  – बँक आणि एटीएमच्या रांगेत तासनतास ताटकळणा-या नागरीकांसाठी आजपासून पेट्रोल पंपावर कॅश काढण्यासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपावरुन नागरीकांना आता २ हजार रुपयांपर्यंत कॅश काढता येईल. सुरुवातील देशातील अडीचहजार पेट्रोलपंपावर ही सुविधा मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्ड स्वाईप मशिनवरुन तुम्ही हे पैसे काढू शकता.