Home Top News विदेशी नागरिक सुकमा भागातून बेपत्ता,अपहरणाची शंका

विदेशी नागरिक सुकमा भागातून बेपत्ता,अपहरणाची शंका

0

रायपूर,दि.२८- छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित भागातुन विदेशी नागरीक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे.कॅनडा येथील जॉन नामक संशोधक हे बस्तर मध्ये दाखल झाले होते.परंतु कालपासुन बेपत्ता असुन त्याच्या मोटरसायकलला असलेल्या जीपीएसवर त्याचे शेवटचे लोकशन सुकमा जिल्हयातील माओवादांचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील भागातील सिगनगट्टी येथे आढळले आहे.त्यामुळे माओवाद्याकडुन त्यांच्या अपहरणाची शक्यता पोलीसाकडुन वर्तविली जात आहे.दरम्यान पोलिसांनी विदेश नागरिकासाठी शोध मोहीम सुरु केली आहे.

Exit mobile version