Home Top News काश्मीरमध्ये पोलीस लाईनवर दहशतवादी हल्ला, चार जवान जखमी

काश्मीरमध्ये पोलीस लाईनवर दहशतवादी हल्ला, चार जवान जखमी

0

पुलवामा, दि. 26 (वृत्तसंस्था)- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील जिल्हा पोलीस लाईनवर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चार सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. या ठिकाणी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांनी पोलिस लाईनवर थेट गोळीबार केला. यावेळी तैनात असलेले दोन पोलीस आणि दोन सीआरपीएफचे जवान जखमी झाले.

Exit mobile version