Home विदर्भ शिवसेना पदाधिका-यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश

शिवसेना पदाधिका-यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश

0

साकोली,दि.25- भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि लाखनी तालुक्यातील शिवसेना पदाधिका-यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काॅग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने साकोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला खिंडार पडली आहे.शिवसेनेचे माजी साकोली तालुका प्रमुख नरेश करंजेकर आणि लाखनी तालुका प्रमुख सुगम खेडिकर सोबत शाखा प्रमुख दिनेश रोकडे, भोजराज करंजेकर,राष्ट्रवादीचे तालुका महासचिव उमराव करंजेकर आदींनी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थिती काॅग्रेसमध्ये प्रवेश घेतला.यावेळी नरेश करंजेकर यांनी डाॅ.अजयराव तुमसरे आणि साकोली तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकिशोर समरीत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version