Home Top News भंडारा जिल्ह्याच्या सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर शहिद

भंडारा जिल्ह्याच्या सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर शहिद

0

भंडारा,दि.23ः- पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोना गावचे सुपुत्र  मेजर प्रफुल्ल मोहरकर हे आज शहीद झाले आहेत. त्यांचे वय 32 वर्ष एवढे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अबोली व मोठा आप्त परिवार आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेकटरमध्ये मेजर मोहरकर यांच्या नेतृत्वात नियंत्रण रेषेवर पेट्रोलिंग सुरू असताना पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. त्यात मेजर मोहरकर यांच्यासह जवान कुलदीप सिंग, जवान परगत सिंग आणि  जवान कुलदीप सिंग शहीद झाले. शहिद प्रफुल्लने देशविघातक पाकिस्तानी सैनिकांच्या कारवायांना प्रत्युतर देत आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी केलेल्या बलीदानाला कुणीही विसरणार नाही.प्रफुल शहिद झाल्याचे वृत्त येताच जन्मगाव जुनोना येथेच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यातच शोकाकूल वातावरण निर्माण झाले असून सोशलमिडियावर त्यांच्या विरमरणावर श्रध्दांजली वाहून नागरिक आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत आहेत.गुरमेलसिंग हे पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील आणि परगतसिंह हे हरियानातील कर्नाल जिल्ह्यातील आहेत.

Exit mobile version