Home विदर्भ शेतकरी, शेतमजुरांचा विश्वासघातकी सरकारला धडा शिकवा-खा.प्रफुल पटेल

शेतकरी, शेतमजुरांचा विश्वासघातकी सरकारला धडा शिकवा-खा.प्रफुल पटेल

0

सडक-अर्जुनी,दि.23 : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने गोर गरीब शेतकरी, शेतमजुरांचा विश्वासघात केला आहे. वाढती, महागाई, बेरोजगारी या समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. केवळ विकास कामांच्या नावाखाली भूमिपूजन केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात विकास कोसो दूर आहे. रस्ते तयार करण्यासाठी व खड्डे बुजविण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पण, रस्ते सोडा साधे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात हे सरकार अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी आज शनिवारी येथे केली.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सडक-अर्जुनी येथील त्रिवेणी हायस्कूलच्या पटागंणावर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, महिला आघाडी अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,जि.प.सदस्य रमेश चुºहे, जि.प.सदस्य रमेश ताराम, एम. आर. टी. शहा,सरपंच जीवनलाल लंजे,माजी जि.प.उपाध्यक्ष छायाताई चव्हाण,ओबीसी आघाडी अध्यक्ष  प्रभाकर दोनोडे,रायुका अध्यक्ष किशोर तरोणे, माजी पं.स.सभापती वंदना डोंगरवार, देवचंद तरोणे, माजी जि.प. सदस्य नरेश भेंडारकर, मिलन राऊत, माजी नगराध्यक्ष शिव शर्मा,  रजनी गिऱ्हेपुंजे, जि.प. सदस्य कैलास पटले, सरपंच डी.यु.रहागंडाले, माजी नगराध्यक्ष गिता लांजेवार, प्रभुदयाल लोहिया, शिवाजी गहाणे,  दिनेश कोरे, उमराव मांढरे, सुखदेव कोरे, ईश्वर कोरे उपस्थित होते.
ना.पटले म्हणाले, यंदा गोंदिया जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर शेती पावसाअभावी पडीक राहिली. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मात्र राज्य सरकारने नुकसान भरपाई म्हणून तुटपुंजी मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. ज्या शेतकऱ्यांची शेती पडीक राहिली त्यांना २५ हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी. सरकारने धानाला प्रती क्विंटल २०० बोनस जाहीर करुन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप पटेल यांनी केला. राज्य व केंद्रातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तत: केली नसून हे सरकार शेतकरी विरोधी व फसवे असल्याचा आरोप केला. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अविनाश काशिवार यांनी केले तर आभार छायाताई चव्हाण यांनी मानले.

Exit mobile version