Home Top News छत्तीसगड सीमेवरुन नक्षलवाद़यास अटक

छत्तीसगड सीमेवरुन नक्षलवाद़यास अटक

0

गडचिरोली, ता.१3-विविध ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये सहभागी असलेल्या नक्षलवाद़यास पोलिसांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरुन अटक केली आहे. आशिक उर्फ गोविंद सनकुराम पुडो(१९) असे अटक केलेल्या नक्षल्याचे नाव आहे.
आशिक पुडो कंपनी क्रमांक ४ चा सदस्य असून, सीमावर्ती भागात त्याचा वावर होता. साध्या वेशात रेकी करण्यात तो तरबेज होता. मूळचा धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत मरकेगाव येथील रहिवासी असलेला आशिक पुडो छोटा झेलिया, पदाबोरिया, पावरवेल, शिवघाट इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकीत सहभागी होता. जिल्हा पोलिस व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी त्यास सीमावर्ती भागातून अटक केली. त्याच्या अटकेमुळे नक्षल चळवळीला हादरा बसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Exit mobile version