केजरीवाल हे संघाच्याच योजनेचा भाग:दिग्विजय

0
8

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॉंग्रेसमुक्त भारताच्या योजनेचाच भाग असल्याचा खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे सरटिणीस दिग्विजय सिंह यांनी आज (रविवार) केला.

“केजरीवाल हे संघाच्याच कॉंग्रेसमुक्त भारत योजनेचा एक भाग आहेत. माझ्या या वक्तव्यावर संघ व केजरीवाल यांच्या चाहत्यांकडून तीव्र टीका करण्यात येईल, याची मला कल्पना आहे. मात्र अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामागे संघ असल्याच्या विधानानंतरही माझ्या डोक्‍यावर परिणाम झाल्याची टीका करण्यात आली होती. परंतु अंतिमत: माझे म्हणणे सत्य ठरले होते. यावेळीही माझेच विधान खरे ठरेल,‘‘ अशा आशयाचे ट्‌विट सिंह यांनी केले आहे.

केजरीवाल यांच्या आपने नुकताच दिल्ली राज्य निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा (भाजप) दारुण पराभव करत नेत्रदीपक विजय मिळविला आहे.