Home Top News जखमी बिबट्याचा फरफटत नेल्याने मृत्यू

जखमी बिबट्याचा फरफटत नेल्याने मृत्यू

0

गोंदिया,दि.10 – कधी-कधी माणसाचे क्रौर्य रानटी जनावरापेक्षाही अधिक भयंकर असते. निष्पाप प्राण्यांना या क्रौर्यामुळे नाहक जीव गमवावा लागतो. याचाच प्रत्यय अर्जुनी तालुक्यातील कोयलारी बिटमध्ये आला. ८ महिन्यांच्या एका जखमी बिबट्याला काही बेदरकार तरुणांनी फरफट नेऊन फेकून दिले. फरफटत नेऊन फेकून दिल्याने त्या बिबट्याचा मृत्यू झाला.या तरुणांनी जखमी बिबट्याची शेपटी धरून त्याच्याशी फोटो काढणे, त्याला फरफटत नेणे आणि फेकून देण्यासारखी दुष्कृत्ये केली. यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने यामध्ये सामील असलेल्या पैकी प्रकाश पुराम, लोकेश कापगते आणि असिफ गोंडील या तिघांना अटक केली आहे. तर काहींचा शोध घेण्याचे काम चालू आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड (सडक अर्जुनी) यांनी सांगितले.

Exit mobile version