Home Top News कोरची तालुक्यात नक्षलवाद्यांनी जाळले दोन ट्रॅक्टर, तीन मशिन्स

कोरची तालुक्यात नक्षलवाद्यांनी जाळले दोन ट्रॅक्टर, तीन मशिन्स

0

गडचिरोली(कोरची)दि.10 : रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनी 765 के व्ही उच्च दाब वाहिनीचे टॉवर उभारण्याचे काम कोरची तालुक्यातील मसेली मयालघाट आंबेखारी परिसरात सुरु आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी दोन ट्रॅक्टर व 3 तार ओढण्याच्या मशिन्स जाळून टाकल्या. ही घटना सायंकाळी चार वाजता झाल्याची घटना घडली असून, सहा वॉकीटॉकी नक्षलवादी घेऊन गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून आदिवासींची हत्या व जाळपोळीचे सत्र सुरूच आहे. 9 फेब्रुवारीला कोरची तालुक्यातील आंबेखारी मयालघाट परिसरात सुरू असलेल्या उच्च दाब वीज जोडणीच्या कामावर सुरू असलेले दोन ट्रॅक्टर 3 तार ओढण्याच्या मशिन्स जाळली. त्यामुळे कोरची तालुक्यात दहशत पसरलेली आहे. तसेच उच्च दाब विद्युत जोडणी करीत असलेल्या मजुरांकडून सहा वॉकीटॉकी पळवून नेल्याची माहिती आहे. मात्र, सदर घटनेबाबत गुन्हा दाखल झालेला नाही.

Exit mobile version