
वर्धा,दि.02ः वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारात कार्यरत असलेल्या एका सैनिकाने आपल्या पत्नीला सर्व्हीस गनने गोळी मारत स्वतःआत्महत्या केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.या घटनेत पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू तर पती सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अजयकुमार सिंग असे सैनिकाच नाव तर प्रियांका कुमारी पत्नीचे नाव असून ते बिहार राज्याचे रहिवासी होते. दोन वर्षांपूर्वी लग्न यांचे लग्न झाले होते घटनेचे कारण अद्यापही कळू शकलेले नसून पोलीस या संदर्भात तपास करीत आहे.