प्रलंबित प्रकरणे निकाली काढा-शिक्षक भारती

0
50

गोंदिया,दि.22: जिल्ह्यातील शिक्षकांची मागील २ वर्षापासून प्रलंबित असलेली प्रकरणी निकाली काढा यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षक भारतीच्यावतीने शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तसेच त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
चर्चेत मागील २ वर्षापासून प्रलंबित असलेले स्थायी प्रकरण निकाली काढून दोषींना पत्र देऊन कारवाई करावी, कोविड सर्वेक्षणातून शिक्षकांना मोकळे करावे, सेवापुस्तके अद्यावत करण्यात यावे या विषयावर चर्चा करण्यात आली. यावर २० सप्टेंबर पर्यंत गटशिक्षणाधिकाèयांना पत्र देण्यात येईल असे शिक्षणाधिकारी हिवारे यांनी सांगितले. वेतन दिरंगाई संदर्भातील प्रश्न कायमस्वरुपी सोडविणञयासाठी जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा अवलंब करुन थेट शिक्षकांच्या खात्यावर जिल्हा परिषद मधूनच जमा करण्याची मागणी केली. यावर सर्व शिक्षकांचे शुन्य बॅलन्स खाते एसबीआयमध्ये तात्काळ उघडून वित्त व कोषागार विभागाशी चर्चा करुन सीएमपी वेतन प्रणाली लावण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे हिवारे यांनी सांगितले.
संगणक सूट,डीसीपीएम निवृत्त कर्मचाèयांना १० लाखांचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, सेवानिवृत्त शिक्षकांची प्रकरणे निकाली काढावी, १४ वित्त आयोगातून शाळेचे वीज बिल ग्रामपंचायतने भरण्यासंदर्भात सुचना कराव्यात इत्यादी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन शिक्षणाधिकारी हिवारे व उपशिक्षणाधिकारी आर.पी.रामटेके यांनी दिले. याप्रसंगी शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, प्रकाश कुंभारे व सांगोळे उपस्थित होते.