Home Uncategorized गोंदिया येथे जैनकलार समाजाची कोजागिरी उत्साहात साजरी

गोंदिया येथे जैनकलार समाजाची कोजागिरी उत्साहात साजरी

0

गोंदिया,दि.13-गोंदिया जिल्हा जैनकलार समाज संघटनाचे वतीने काल बुधवारी (दि.12) कोजागिरी उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुखराम खोब्रागडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिव शालिकराम लिचडे, कोषाध्यक्ष तेजराम मोरघडे, माजी सचिव महेंद्र सोनवाने, युवा समिती अध्यक्ष मनोज किरणापुरे, सचिव विजय ठवरे, महिला समिती अध्यक्ष प्राजक्ता रणदीवे, सचिव हर्षा आष्टीकर  आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात परमेश्वराच्या आराधना व पूजन करुन करण्यात आली. तदनंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणानंतर युवा, महिला व बाल गोपालांचे रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले. गरबा, संगीत खुर्ची, गीत, डान्स व अंताक्षरी घेऊन आनंद लुटला.
कार्यक्रमाचे संचालन समाजाचे सहसचिव यशोधरा सोनवाने यांनी केले. उपस्थितांचे आभार विजय ठवरे यांनी मानले.
समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवरी येथे जैन कलार समाजाची कोजागिरी उत्साहात

स्थानिक मॉ धुकेश्वरी मंदीर सभागृहात देवरी येथील जैन कलार समाजाच्या कोजागिरी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्य़ात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री व्यंकटराव भांडारकर हे होते. यावेळी मंचावर सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी हेमराज रामटेककर. संदीप तिडके, श्री बनपूरकर, श्री सोनवाने आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, देवरी येथील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Exit mobile version