छत्रपतींच्या अश्वारुढ मूर्तीचे जल्लोशात स्वागत,लवकरच होणार प्रतिस्थापना

0
19

गोंदिया,दि.17 -शहरातील मनोहर चौक ते फुलचूर नाका दरम्यान निश्चित करण्यात आलेल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ मूर्तीची प्रतिक्षा संपली आहे.16 फेब्रुवारी रोजी महाराजांच्या 13 फूट अश्वारुढ मूर्तीचे स्थापना स्थळी जल्लोशात स्वागत करण्यात आले.
मूर्ती दानदाते आदित्य दीपक सावंत व सावंत कुटूंबीयांनी शिवप्रेमी,शहरवासींच्या छत्रपतींच्या भव्य मूर्तीचे स्वप्न पूर्ण
केले.या मूर्तीची फुलचूर नाका येथून ढोलताशा पथकाच्या गजरात,तलवारबाज,घोड्यावर स्वार महाराजांची व जीजाऊंची वेषभूषा धारण केलेल्या युवक,युवतीं तसेच चिमुकल्यांच्या उपस्थितीत महाराजांचा जय जयकारात शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान स्थापना स्थळी मॉ भवानी प्रतिष्ठानच्या मुलामुलींच्या ढोल ताशा पथकासह शिवभक्तांनी महाराजांचा जयघोष करीत जल्लोशात स्वागत केले.
महाराजांच्या मूर्तीची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे.उत्सवासाठी मराठा समाज संघटना, विविध समाजाच्या
संघटना,सहयोग परिवार,श्री गजानन महाराज मंदिर संस्थान,विश्व हिंदू परिषद,शिव प्रतिष्ठान तसेच श्याम बाबा
घोडीवाले,पंजाबी ढोल, बग्गी पथकाने मोलाची भूमिका बजावली. शोभायात्रेदरम्यान, बैठक व पिण्याच्या पाण्याची
व्यवस्था ॠषी श्रीभात्रे व अंकित, चहाची व्यवस्था महेंद्र खंडेलवाल, आईसक्रीमची व्यवस्था अमित अग्रवाल तसेच
अल्पोहाराची व्यवस्था महाकाल समितीचे कल्लू यादव यांनी केली होती.छत्रपतींच्या मूर्ती आगमनाच्या या
सोहळ्यात सहभागी सर्वांचे श्री शिव छत्रपती मराठा समाज व श्री शिवाजी महाराज प्रतिमा देखरेख समितीने
आभार व्यक्त केले आहे.