जुन्या पेन्शनसाठी गोंदियात आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कर्मचाऱ्यांची काढली पदयात्रा

0
41

गोंदिया,दि.18ः जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय, नियमशासकीय कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे.याच अनुषंगाने गोंदिया तालुक्यातील व जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी आज शनिवार 18 मार्च रोजी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सहकुटुंब आंदोलनात सहभागी होत शहरातील मुख्य रस्त्यांने पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधले.येथील प्रशासकीय इमारत कार्यालयाजवळून पदयात्रेला सुरवात करण्यात आली.ही पदयात्रा सिव्हील लाईन,नेहरु चौक,गोरेलाल चौक,दुर्गा चौक,गांधी प्रतिमा चौक व जयस्तंभ चौक मार्गे परत प्रशासकीय इमारतीजवळ पोचली.कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या पदयात्रेचा समारोप करुन शासनाच्या भूमिकेविरोधात राज्य,जिल्हा परिषद कर्मचारी तथा निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने केली, शासन विरोधात घोषणा बाजी करून जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात आली .

आंदोलनात आंदोलनाचे समन्वयक लीलाधर पाथोडे,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र सहसचिव आशिष रामटेके,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी.चव्हाण,सरचिटणीस शैलेष बैस,सुभाष खत्री,मनोज मानकर,ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,दयानंद फटींग,रामा जमईवारी, चंद्रशेखर वैद्य जिल्हाध्यक्ष पाटबंधारे विभाग जिल्हा गोंदिया,शैलेश भदाणे राज्यध्यक्ष वनविभाग महाराष्ट्र,राकेश डोंगरे सचिव महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना गोंदिया,राज कडव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गोंदिया,लिपिक वर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तोमर,सौरभ अग्रवाल,अभियंता संघटनेचे इंजि. गोवर्धन बिसेन,आनंद चर्जे,चित्रा ठेंगरी,तेजस्विनी चेटुले,एस.यु.वंजारी,अनिरुध्द मेश्राम,एल.यु.खोब्रागडे,डी.टी.कावळे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भगीरथ नेवारे,पी.डी.चव्हाण,पंकज पटेल,यशोधरा सोनवाणे,नितु डहाट,संजय उके आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.