रक्तदान शिबीरादरम्यान कर्मचारी यांनी केलेली जनजागृती लक्षवेधी ठरली
रक्तदान शिबीरा दरम्यान जनजागृती करुन 22 लोकांनी केले रक्तदान
आरोग्यवर्धिनी केंद्र भानपुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम बिसेन यांनी स्वत: रक्तदान करुन 22 लोकांना केले प्रोत्साहीत
समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी तसेच आरोग्याची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी ‘आयुष्यमान भव‘ मोहीम जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.या मोहिमे अंतर्गत आरोग्याशी संबधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला असुन जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत लोकोपयोगी आरोग्य कार्यक्रमे राबविण्यात येत आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्र भानपुर येथे दि.18 सप्टेंबर रोजी आयुष्मान भव: मोहिम अंतर्गत गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेद्प्रकाश चौरागडे यांच्या संकल्पनेतुन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरा दरम्यान 22 लोकानी रक्तदान करुन महादानाचे काम केलेले आहे. रक्तदान शिबीरादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम बिसेन यांनी स्वत: रक्तदान करुन 22 लोकांना प्रोत्साहीत करुन अनमोल काम केलेले आहे. त्यापाठोपाठ रक्तदान शिबीरादरम्यान आरोग्य कर्मचारी व रक्तदाते यांनी केलेली जनजागृती तसेच रांगोळी लक्षवेधी ठरली. जनजागृती साठी डॉ अस्मिता दिक्षीत यांनी महत्वपुर्ण भुमिका निभावली.
शिबिरा दरम्यान सर्व रक्तदाते यांना वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम बिसेन व डॉ अस्मिता दिक्षीत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवुन गौरविण्यात आले. शिबिरादरम्यान रक्तदानाविषयीचे जनजागृती पोस्टर व रांगोळीच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.
युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करावे म्हणजे रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासणार नाही असे आवाहन डॉ. शुभम बिसेन यांनी केले. डॉ अस्मिता दिक्षीत यानी रक्तदानाचे महत्वबाबतची माहीती दिली. सिकलसेल रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने वारोवार रक्त चढण्याची वेळ येते अशा रुग्णांसाठी लोकांनी स्वेच्छेने रक्तदान करावे याची माहिति दिली.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक तांभे व न्यायखोर , आरोग्य सेविका सरिता ठाकरे, ललीता गौतम, कनिष्ठ सहाय्यक रविंद्र वघारे,डाटा एन्ट्री ऑपरेटर विशाखा मेंढे, फार्मासिष्ट बांगरे, परिचर मंदा बंन्सोड , अश्विन, अंजली व पर्वता यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळ –
1) रक्तदान शिबिरा दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र भानपुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम बिसेन
यांनी रक्तदान केल्यानंतर प्रमाणपत्र व सत्कार करताना डॉ अस्मिता दिक्षीत
2) रक्तदान शिबिरा दरम्यान डॉ अस्मिता दिक्षीत यांनी साकारलेली रांगोळी.
3) रक्तदान शिबीरादरम्यान आरोग्य कर्मचारी व रक्तदाते यांनी केलेली पोस्टर जनजागृती.
4) आरोग्यवर्धिनी केंद्र भानपुर येथील कर्मचारी यांनी रक्तदान शिबीरादरम्यान केलेली जनजागृती