Home Uncategorized पोलिस पाटील पदांच्या ९५ जागांकरीता ९४३ अर्ज प्राप्त

पोलिस पाटील पदांच्या ९५ जागांकरीता ९४३ अर्ज प्राप्त

0

= पडताळणीअंती ७२ अर्ज प्रलंबित ४३ उमेदवारांचे अर्ज ठरले अपात्र
अर्जुनी मोर.(सुरेंद्रकुमार ठवरे )-अर्जुनी मोरगाव उपविभागीय कार्यालयातर्गत सडक अर्जुनीच्या २७ तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ६८ पोलीस पाटील पदाकरिता बिंदू नामावलीनुसार आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दिनांक ८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.त्यात एकूण ९५ पदाकरिता तब्बल ९४३ अर्ज प्राप्त झाले आहेत.प्राप्त अर्जाची तपासणी पडताळणी करून 943 अर्जांपैकी ८२८ अर्ज पात्र ठरविण्यात आले. तर 43 अर्ज अपात्र करून ७२ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी दिली.प्रलंबित असणाऱ्या अर्जाची तलाठी ग्रामसेवक यांच्या मार्फत स्थानिक रहिवासी असल्याची चौकशी करून संबंधित अर्जदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत २९ सप्टेंबर पर्यंत पुर्ततः करण्याच्या सूचना देण्यात आले आहे. अन्यथा दिलेल्या वेळेत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्या उमेदवारांना अपात्र यादीत टाकले जाईल. यादी नमूद उमेदवारांचे पुरावे किंवा कुठल्याही बाबतीत कुणाला आक्षेप उजर तक्रार अथवा हरकत असल्यास याबाबत दिनांक ४ ऑक्टोंबर २०२३ दुपारी १ वाजेपर्यंत उपविभागीय कार्यालय अर्जुना मोर येथे सादर करावा तसेच पात्र प्रलंबित यादी प्रमुख उमेदवारांचे स्थानिक चौकशी करून घेण्यात येईल.
सर्वाधिक अर्ज महागाव आणि चान्ना बाक्टीत
आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा निर्माण करण्यात आली होती.तालुक्यातील महागाव आणि चान्ना बाक्टीत खुल्या प्रवर्गासाठी जागा आरक्षित झाल्यानंतर अर्जदारांनी मोठ्या प्रमाणात आपले अर्ज सादर केले तालुक्यातून सर्वाधिक अर्ज महागाव तथा चान्ना बाक्टी या दोन्ही गावातून समसमान २८ अर्ज कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.तर सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी तेली येथे २५ आणि घोटी इथून २६ सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
या गावातून केवळ एक अर्ज
दिनांक २१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पोलीस पाटील पदभरती २०२३ करिता अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी च्या २७ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले. जाहीर झालेल्या आरक्षणा नुसार त्या – त्या गावातील अर्जदारांना अर्ज करण्याच्या संधी देण्यात आल्या मात्र खोकरी त्याचबरोबर तिरखुरी अनुसूचित जातीकरता आरक्षित होते. कोरंभिटोला आर्थिक दुर्बल घटकांतरीता बोळदा कवठा इतर मागासवर्गीय करिता मांडोखाल आर्थिक दुर्बल घटकांकरिता येथे आरक्षित झालेल्या जागेकरिता केवळ प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाला.सडक अर्जुनी तालुक्यातील बोळूदा येथे १ अर्ज प्राप्त आहे.या उमेदवारांना लेखी परीक्षेत ४५ टक्के म्हणजेच ३६ गुण घेणे अनिवार्य असेल तथा तोंडी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ‌

Exit mobile version