
मुंबई : जगभरात ज्याला प्रसिद्धी मिळते अशी ऐतिहासिक पंढरपूरची वारी (Pandharichi wari) आहे. या वारीसाठी लाखो वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते भाविक वारीत जात असतात. मात्र, असं असताना एक नवीनच प्रकार समोर आला आहे, काही अर्बन नक्षलवादी (Naxal) वारीत शिरले आहेत, ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत, असे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी म्हलं आहे. विशेष म्हणजे यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आता, आमदार कायंदे (Manisha kayande) यांच्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आता, आमदार आदित्य ठाकरे यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
देवाला न मानणारे नास्तिक हे अर्बन नक्षलवादी असा शोध शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी लावला! टीका करण्याची इच्छा उरली नाही इतकी बौद्धिक दिवाळखोरी आहे… यांना आमदार कोण बनवते हा प्रश्न विचारण्याला अर्थ नाही! #बौद्धिकदिवाळखोरी pic.twitter.com/K09FwFNmoJ
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) July 2, 2025
देवाला धर्माला ही लोकं मानत नाही, हा त्यांचा अधिकार आहे. हिंदू धर्म आणि वारीबद्दल अपप्रचार करत आहेत, लोकांचा बुद्धीभेद करत आहेत. पंढरपूरची वारी अशी आहे जिथे कोणी कोणाला निमंत्रण देत नाही. वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना जसे पर्यावरण दिंडी, संविधान दिंडीसारख्या गोष्टी समोर आल्या आहेतस, पथनाट्य करतात, असे शो करतात. एक दिवस तरी वारी अनुभवा, हा माणूस कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. सासवड येथे ही लोकं पोहोचतात आणि त्यांच्या वारीचा रुट देखील आहे. क्युआर कोड त्यांनी दिलाय जो ब्लॅकलिस्टेड आहे, असं दिसतंय. पंढरपूरच्या वारीचा ही लोकं गैरफायदा घेत आहेत, अशी माहिती मनीषा कायंदे यांनी सभागृहात दिली.
अंधश्रद्धा निर्मुलनाच्या नावाखाली गैरप्रकार
वारीत अनेक महिला वारकरी आपण पाहातो, तुळशीचं रोप घेऊन काही महिला चालतात. इतर कोणत्या गोष्टींचा प्रचार प्रसार करायचा असेल तर त्यांचा उपयोग करू शकता. काही वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि आम्ही देखील सांगितलं ही या गोष्टीला आळा घाला. सन 2010, 2011 पासून ह्या लोकांवर गुन्हे नोंद आहेत. जामिनावर असलेले लोकं देखील यात आहेत, अंधश्रद्धा निर्मुलनाच्या नावाखाली हे सर्व सुरू आहे, असा आरोप करत कायंदे यांनी अंनिसकडे बोट दाखवले आहे. वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. वारीचा गैरफायदा घेऊ नये हाच उद्देश आहे. महिला संविधानाचे पुस्तक घेऊन आम्ही चालतात, संविधानाच्या नावाखाली फेक नॅरोटिव्ह पसरवणारी ही लोकं तेच तर नाहीत ना, असा सवालही कायंदे यांनी विचारला आहे.