38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Uncategorized भंडारा-गोंदियात विधान परिषदेत महायुतीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत

भंडारा-गोंदियात विधान परिषदेत महायुतीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत

0
2

 

तिरोडा

विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात आता महायुतीमध्येच थेट लढत होणार आहे.काँग्रेसचे उमेदवार दिलीप बन्सोड आणि अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांनी माघार घेतल्याने चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता मैदानात उरलेल्या उमेदवारांमध्ये चुरस वाढली आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून नरेश ईश्वरकर आणि भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर हे रिंगणात आहेत.

NCP च्या नरेश ईश्वरकर विरुद्ध भाजपचे अविनाश ब्राह्मणकर अशी थेट लढत होणार आहे. दोन्ही पक्ष महायुतीत असले तरी जागा सोडण्यास तयार नसल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे.पुढील गणित काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार माघारी गेल्याने त्यांच्या मतदारांचा कल कोणाकडे वळतो यावर निकाल अवलंबून राहणार आहे. पदवीधर मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने प्रचाराची धार आता अधिक तीव्र होणार आहे.

blank