युवा मराठी पत्रकार संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे एसडीपीओ ढाेलेंच्या हस्ते उद्धघाटन

0
148

देवरी(सुभाष सोनवाने),16:लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असलेला पत्रकार आणि समाजातील समस्यांना वाचा फोडून प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित करुण समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणाऱ्या युवा मराठी पत्रकार संघ देवरीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या हस्ते आज बुधवारला पार पडले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ललित कुकडे ,नायब तहसिलादार ओंकार ठाकरे,प्रितपालसिंग भाटिया ऍड. सचिन बावरीया,बाजार समिती सभापती रमेश ताराम,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चांदेवार,चेतन उईके, नितेश वालोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी निर्भीळ पत्रकारिताच जनसामान्यांचा आधार असून पत्रकारच समाजातील समस्या समोर आणून महत्वाची भूमिका बजावतो असे विचार व्यक्त केले.तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी कार्यालयाचा अग्रभागात तक्रार पेटी लावण्यात आली आहे.प्रास्तविक संघाचे अध्यक्ष मुकेश खरोले यांनी केले.संचालन सचिव डॉ. सुजित टेटे यांनी तर आभार भुपेंद्र मस्के यांनी मानले.
कोविड-१९ विषाणुचे प्रतिबंधात्मक उपाय, मास्क, सँनीटायजेर चा वापर करुण कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी युवा पत्रकार संघाचे अरशद शेख, सुभाष सोनवाने, विलास चाकाटे, योगराज साखरे, सुदर्शन लांडेकर, कैलास कोडापे, बबलू गिर्हेपुंजे,तुलाराम कुराडे, दालचंद मडावी, राजेश बिंझलेकर धर्मेंद्र जगणिक , रुपेशकुमार टेम्भुरकर, यांनी महत्वाची भूमिका बजावली.