खाजगी हॉस्पिटलवर नियंत्रण व तक्रार निवारणासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक

0
67

गोंदिया, दि.२५ – जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. उपचारासाठी कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण हे खाजगी रुग्णालयात दाखल होत आहेत. खाजगी रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांकडून योग्य देयकाची आकारणी व्हावी तसेच रुग्णांच्या काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण व्हावे म्हणून जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कोविड-19 रुग्णांकरीता राखीव ठेवलेल्या हॉस्पीटलवर नियंत्रण ठेवण्याकरीता पुढील प्रमाणे नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख (8308118967) सहयोग हॉस्पीटल गोंदिया, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती लिना फाळके (7028910319) मिरावंत हॉस्पीटल गोंदिया, सहायक लेखाधिकारी सुशील जक्कुलवार (9689938211) राधेकृष्ण हॉस्पीटल गोंदिया, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदीप भिमटे (9527722362) सेन्ट्रल हॉस्पीटल गोंदिया, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीमती पुजा पाटील (8087273973) केएमजे हॉस्पीटल गोंदिया, महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर (9421779220) बहेकार हॉस्पीटल गोंदिया यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तरी संबंधित रुग्णांनी खाजगी रुग्णालयात भरती झाल्यानंतर मिळणाऱ्या सोयी-सुविधा तसेच आकारण्यात येणार देयक याबाबत काही तक्रारी असल्यास संबंधित नियंत्रण अधिकारी यांच्याकडे आपली तक्रारी नोंदवावी. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.