40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ३०३ रुग्ण झाले कोरोनामुक्त;नव्या ३०८ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद   

३०३ रुग्ण झाले कोरोनामुक्त;नव्या ३०८ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद   

0
291

blank

गोंदिया, दि.२५ – जिल्ह्यातील ३०३ रुग्ण उपचारातून बरे झाले आहेत. तर नव्या ३०८ रुग्ण पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली असून ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज  ३०८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १८० रुग्ण आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील सत्तीबोडी चौक-१, अवंती चौक-१, मामा चौक-४, दुर्गा चौक-१, सिव्हील लाईन-१२, श्रीनगर-१२, गोंदिया-२२, खमारी-७, टी.बी.टोली-५, धापेवाडा-१, राजाभोज कॉलनी-३, बजरंग नगर-१, गाडगेनगर-१, गौशाला वार्ड-५, पुनाटोली-२, गणेशनगर-१५, खापर्डे कॉलनी-१, गजानन कॉलनी-३, मुर्री-२, अदासी-१, देशबंधू वार्ड-१, कारंजा-२, गोविंदपूर-४, फुलचूर-२, छोटा गोंदिया-१, पंचायत समिती कॉलनी-४, विवेकानंद कॉलनी-१, गंज वार्ड-३, सेलटॅक्स कॉलनी-२, पैकनटोली-१, जनता कॉलनी-१, रेलटोली-२, न्यू लक्ष्मीनगर-४, बाजपेई वार्ड-१, काटी-१, कुंभारेनगर-१, भिमनगर-१, बसंतनगर-१, माताटोली-३, कमरगाव-१, कन्हारटोली-२, स्वैराटोला-१, रामनगर-१, बी.एम.पटेल वार्ड-१, गुरुनानक वार्ड-३, लक्ष्मी वार्ड-१, गांधी वार्ड-२, सिंधी कॉलनी-३, कुडवा-२, गोसाईटोला-१, लोधीटोला-१, बरबसपुरा-५, मरारटोली-२, यादव चौक-१, तुमखेडा-१, शिवनगर-२, मनोहर वार्ड-१, शास्त्री वार्ड-१, मोरवाही-३, मयुर लॉन-१, हनुमान नगर-१, नागरा-१, गड्डाटोली-१, गोरेलाल चौक-४ व मुंडीपार येथील एक रुग्ण.

तिरोडा तालुक्यातील तिलक वार्ड-१४, तिरोडा-१४, गोंडमोहाडी-१, शास्त्री वार्ड-१, झाकीर हुसेन वार्ड-१, सिल्ली-१, गांधी वार्ड-१, बेलाटी-१, सुकडी-१, पिंडकेपार-२, बघोली-१, वडेगाव-३, फुले वार्ड-१, बिहिरीया-१, नेहरु वार्ड-२, गराडा-१, सरांडी-१ व सावरी येथील एक रुग्ण. आमगाव तालुक्यातील रिसामा-१, आमगाव-३ व धामणगाव येथील एक रुग्ण. सालेकसा तालुक्यातील जामखुळा-१, कावराबांध-२, बिजेपार-१, साखरीटोला-४, सालेकसा-२, चिचटोला-२, ब्राम्हणटोला-१ व सातगाव येथील दोन रुग्ण. देवरी तालुक्यातील बोरगाव-१, भरेगाव-२, चिचगड-१ व देवरी शहरातील पाच रुग्ण. सडक/अर्जुनी तालुक्यातील बोथली-१, सडक/अर्जुनी-१६, वडेगाव-४, कोदामेढी-२, बोपाबोडी-४, केसलवाडा-१, पाटेकुर्रा-१, परसोडी-२, राका-१, सौंदड-२, फुटाळा-१, म्हसवानी-१, धानोरी-२ व कोसमतोंडी येथील दोन रुग्ण. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध-३, मोरगाव/अर्जुनी-३, खामखुरा-२ व कहलगाव येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-३४६४, तिरोडा तालुका-८२६ गोरेगाव तालुका-२५३, आमगाव तालुका-३९१, सालेकसा तालुका-२५५, देवरी तालुका-२२४, सडक/अर्जुनी तालुका-२०२, अर्जुनी/मोरगाव तालुका-२२८ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले -८८ रुग्ण आहे. असे एकूण ५९३१रुग्ण बाधित आढळले आहे.

आज ज्या ३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-२१५, तिरोडा तालुका-१६, गोरेगाव तालुका-१६, आमगाव तालुका-२०, सालेकसा तालुका-५, देवरी तालुका-१४, सडक/अर्जुनी तालुका-४ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तेरा  रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत ३८३६ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-२३७६, तिरोडा तालुका-५२२, गोरेगाव तालुका-१३९, आमगाव तालुका- २३७, सालेकसा तालुका-९९, देवरी तालुका-१३८, सडक/अर्जुनी तालुका-१४२, अर्जुनी/मोरगाव तालुका-१७० आणि इतर-१३ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या २०१२ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -१०४३, तिरोडा तालुका-२९०, गोरेगाव तालुका-११२, आमगाव तालुका-१४८, सालेकसा तालुका- १५४, देवरी तालुका-८५, सडक/अर्जुनी तालुका- ५७, अर्जुनी/मोरगाव तालुका-५६ आणि इतर-६७ असे एकूण २०१२ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

क्रियाशील रुग्णांपैकी ९०२ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-४५३, तिरोडा तालुका-१३०, गोरेगाव तालुका-६८, आमगाव तालुका-३५, सालेकसा तालुका-८४, देवरी तालुका-७६, सडक/अर्जुनी तालुका-००, अर्जुनी/मोरगाव तालुका-५७ व इतर ०० असे एकूण ९०२ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.

आतापर्यंत ८३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-४५, तिरोडा तालुका-१४, गोरेगाव तालुका-२, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-२, देवरी तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२ व इतर ठिकाणच्या आठ रुग्णांचा समावेश आहे.

ज्या तीन कोराना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ६७ वर्षीय रुग्ण राहणार बालाघाट यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय रुग्ण राहणार गांधी वार्ड गोंदिया यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ५५ वर्षीय रुग्ण राहणार मुर्री यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २८३९० नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २१२५४ नमुने निगेटिव्ह आले. तर ४००५ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १९५७ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ११७४ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात ११ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ३४८ व्यक्ती अशा एकूण ३५९ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २२५४३ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २०४९४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २०४९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १४९ चमू आणि १३१ सुपरवायझर, १३१ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-५, आमगाव तालुका-११,सालेकसा तालुका-१०, देवरी तालुका-३५, सडक/अर्जुनी तालुका-९, गोरेगाव तालुका-२६, तिरोडा तालुका-२९ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-६ असे एकूण १३१ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.

 वाशिम  जिल्ह्यात आणखी ४९ कोरोना बाधित; १२४ जणांना डिस्चार्ज

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, शृंगऋषी कॉलनी परिसरातील १, नवीन आययुडीपी येथील १, चामुंडादेवी परिसरातील ३, साईलीला नगर येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसरातील ३, विनायक नगर परिसरातील ४, पाटणी चौक परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, पोस्ट ऑफिस जवळील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ४, तामसी येथील १, केकतउमरा येथील २, शेलगाव येथील १, काटा येथील १, रिसोड शहरातील पॉवर हाऊस परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील १, सोनाटी येथील ३, आसेगाव पेन येथील १, गणेशपूर येथील १, व्याड येथील १, बेलखेडा येथील २, मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १, कारंजा लाड शहरातील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२४ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या वाशिम शहरातील दोन महिला व पिंप्री वरघट येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना विषयक अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कुराळा येथील ५० वर्षीय व अमानी ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

 

blank