
मोहाडी(सालई खुर्द)दि.20 : यावर्षी आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडूंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात विक्रमी ९६ टक्के जलसाठा आहे. यंदा मात्र शेतकऱ्यावर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भरपाई काढण्यासाठी शेतकऱ्यांना उन्हाळी धानपिकासाठी बावंनथडी प्रकल्पाचे पाणी नेरला (सालई खुर्द) कालवा क्रमांक २ ला देण्यात यावे अन्यथा तुमसर-रामटेक राज्यमार्गावर दि.२२ ऑक्टोबरला सालई खुर्द बस स्टॉप चौकात तिव्र रास्ता रोखो आंदोलन करण्याचे निवेदन दि. १९ ऑक्टोबर रोजी सहाय्यक अभियंता (श्रेणी एक) बावंनथडी पाटबंधारे उपविभाग बघेडा(तुमसर), महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, नायब तहसिलदार सोनकुशरे, पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे पोलीस स्टेशन आंधळगाव यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त भातशेती लागवटीखाली असून याच धानशेतीमध्ये किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांवर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे कोरोनाच सावट असताना जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवले होते, त्या संकटातून कस बस सावरत असताना आपल्या शेतीमध्ये लक्ष देत भात पीक उभा केला या वर्षी उत्पादन भरपूर होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती व अवघ्या काही दिवसात भात पीक कापणीला आलं असताना आता शेतकऱ्यांच्या शेतीवर किडीचा प्रादुर्भाव असल्याने हाता तोंडाशी आलेला पीक पूर्णतः खराब झाला आहे, आधीच लागवट खर्च, खते, बी, बियाणे, व आता औषधी फवारणी याला लागणार खर्च खूप जास्त असल्याने आता पीकही खराब झाला त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट निर्माण झाला आहे, या आदी सुद्दा पाण्यासाठी अनेक गावातून निवेदन देण्यात आले आहे, मात्र त्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही,
बावंनथडी प्रकल्पाचे अधिकारी फक्त एसीत बसून गप्पा करतात, या बावंनथडी प्रकल्प तयार करण्यासाठी करोडो रुपये खर्च लागले असून पूर्ण बांधकाम करायला जवळपास ४० वर्ष लागले. मात्र या अधिकारी मुळे बावंनथडी प्रकल्प पांढरा हत्ती ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सालई खुर्द, पालडोंगरी, सिहरी, उसर्रा, टांगा, बपेरा,मालिदा, डोंगरगाव, रामपूर आदी परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकाला देण्यात यावे तसे जाहीर नोटीस काडून शेतकऱ्यांना सुचित करण्यात यावे, अन्यथा सालई खुर्द, पालडोंगरी, सिहरी, उसर्रा, टांगा, बपेरा, मालिदा, डोंगरगाव, रामपूर आदी गावातील शेतकरी हजारोच्या संख्येत दि. २२ ऑक्टोबर रोज गुरुवार ला सकाळी १० वाजता तुमसर-रामटेक राज्यमार्गावर बस स्टॉप चौक सालई खुर्द येथे तिव्र रास्ता रोखो आंदोलन करण्याचे निवेदन प्रकाश खराबे, अशोक पटले, किशोर भैरम, नितीन लिल्हारे, हैशोक शरणागत, डॉ सुनील चवळे, भोलाराम पारधी, ईश्वरद्याल गिरीपुंजे, शोभाराम गिरीपुंजे, झनकलाल दमाहे, शिवदास दमाहे, अशोक अटराहे, अमोल बेलेकर, प्रदीप बंधाटे, गजानन दमाहे, महेंद्र सव्वालाखे, शैलेश लिल्हारे, गणेश दमाहे, बबन टाले, प्रदीप सरोते, गोपाल लिल्हारे, शिवदास लिल्हारे, आदींनी दिले आहे.