गोंदिया,दि.21ःजिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या पदावर शासनाने तीन वर्षानंतर गडचिरोली जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांची बदली केली.पुराम यांनी आपल्या पदाचा प्रभार स्विकारला असून गोंदिया जिल्हा ग्रामसेवक युनीयनच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.स्वागतप्रसंगी डेप्युटी सीईओ पुराम यांनी सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन यूनियनच्या शिष्टमंडळाला दिल्याची महिती जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी दिली. यावेळी शिष्टमंडळ मध्ये मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण मानद,जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,सचिव दयानंद फटिंग, कोषाध्यक्ष लक्ष्मण ठाकरे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
गोंदिया :-जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत ) राजकुमार पुराम यांची आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी पुष्प गुच्छ देऊन श्री पुराम यांचे संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. शिस्टमंडळात जिल्हा अध्यक्ष हंसराज पाण्डे, उपाध्यक्ष आर.एन. बहेकार आणि जिल्हा सचिव अरविंद साखरे यांच्यासह अनेक ग्रामसेवक उपस्थित होते.