भंडारा दि.21::- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक जिल्हा भंडारा च्या वतीने राज्यव्यापी आवाहनानुसार 20 ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वाढीव किमान वेतन व इतर प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले .
आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवकुमार गणवीर ,जिल्हाध्यक्ष कॉम्रेड माधवराव बांते व जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले .ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचेमार्फत ग्राम विकास मंत्री माननीय हसन मुश्रीफ, प्रधान सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचे नावे देण्यात आले . निवेदनात 1. महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दिनांक-20/10/2020चे सुधारित किमान वेतन मागील फरका सह देण्यात यावे .2. राहणीमान भत्यासाठी शंभर टक्के अनुदान द्या. तोपर्यंत ग्रामपंचायतीने आपल्या हिस्याची थकबाकी देण्यात यावे .3. ऑनलाइन वेतन अदा केल्यावर त्याची संगणक प्रत ग्रामपंचायतीने द्यावी. भविष्य निर्वाह निधीचा अद्यावत हिशोब देण्यात यावे .कोविड महामारी असेपर्यंत एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्या .भविष्य नि.निधी चा हिशोब द्या. ज्येष्ठता यादी तयार करून दहा टक्के पद भरती करा. इत्यादी मागण्यांचा समावेश आहे .निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत माननीय राजेश बागडे यांनी स्वीकारले आणि तालुकास्तरावर तक्रार निवारण सभा युनियन पदाधिकाऱ्यांसोबत दर तीन महिन्यात घेण्याचे निर्देश दिले व दिनांक 21 ला पहिली सभा मोहाडीला घेण्याचे ठरवून स्वतः उपस्थित राहण्याचे मान्य केले .शिष्टमंडळात कॉम्रेड शिवकुमार गणवीर कॉम्रेड माधवराव बांते काॅ हिवराज उके , कॉम्रेड गजानन लांडसे कॉम्रेड रामलाल बिसने तसेच जयप्रकाश मेहर गौरीशंकर धुमनखेडे, गणेश अंबाडारे यांचा समावेश होता. तर कॉम्रेड वामनराव चांदेवार राजू बडोले कॉम्रेड राजू लांजेवार यांनी सहकार्य केले व यशस्वीरित्या धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली असे काॅ.हिवराज उके यांनी कळविले आहे.