नागरिकांच्या समस्यांचे निवेदन देत राकाँ नेता रविकांत बोपचेंची तहसिलदारांसोबत चर्चा

0
137

तिरोडा,दि.22ः तालुक्यातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दिलेल्या निवेदनाच्या आधारावर त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादी कांग्रेसच्या वतीने युवा नेता रविकांत बोपचे यांच्या नेतृत्त्वात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी सोबत माजी सभापती निताताई रहांगडाले,मनोज डोंगरे,मनोहर राऊत,किशोर पारधी,नत्थुभाऊ अंबुले,जयाबाई धावडे,तुन्डीलाल शरणागत,राजकुमार ठाकरे,देवेंद्र चौधरी,वशिम शेख,जगदीश बावनथडे,संजय रहांगडाले,छोटेलाल बिसेन,भवानीसिंह बैस,यांचेसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी रविकांत(गुड्डू) बोपचे यांनी तालुक्यातील समस्याबाबत तहसीलदार यांना अवगत करुन देत कुटुंब योजने अंतर्गत मागील वर्षभरात अनेक गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावे. त्याच प्रमाणे संजय गांधी निराधार ,श्रावण बाळ व कुटुंब अर्थसहाय्यक योजनेचा लाभ मिळवून द्यावे.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व कुटुंब अर्थसहाय्य योजनेकरीता अर्ज केलेल्या अर्जदारांना त्यांचे अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्याची माहिती देत अर्ज नामंजूर झालेल्या लाभार्थ्याना अर्ज रद्द होण्याचे कारण देण्यात यावे,जेणेकरुन त्यातील त्रुट्या दूर करणे शक्य होईल.अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे अंशत: किंवा पूर्णतः नुकसान झाल्याने अडचणीत आलेल्या कुटुंबाना त्वरित उपलब्ध अनुदानानुसार मदत करावी.रमाई आवास, प्रधानमंत्री आवास व शबरी आवास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची कामे रेती अभावी खोळंबली असल्याने शासनातर्फे अवैध रेती व्यवसायिकाकडून जप्त करण्यात आलेली रेती घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.