परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान,सर्वे सुरू

0
310

अर्जुनी /मोर,दि.22 :-पवनी /धाबे येथील बहुतेक शेतकऱ्यांच्या भातपिकाचे परतीच्या पावसाने नुकसान केले आहे. दरम्यान धाबेटेकडी येथील शेतकरी ताराचंद ठवरे यांच्या भातपिकाची पाहणी करण्यात आली. यामध्ये तलाठी ए. बी. बिसेन, कृषिसाहाय्यक एम. ए. मोरे आणि ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी पंचनामा तय्यार करून वरिष्ठ कार्यालयास सादर करणार असल्याचे सांगितले. शासनाने नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत केल्यास निदान शेती कामाचा खर्च भागवीला जाईल अशी आम्हाला आशा आहे, असे कास्तकार ठवरे यांनी सांगितले.

इसापूर शेत शिवारात पडीत धान पिकाचे सर्वेक्षण सुरू
अर्जुनी-मोर तालुक्यातील काही भागात मागील पंधरवड्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला होता. त्यामध्ये धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. वादळी वाऱ्याने व पावसानी धान पिक पडले त्यामुळे धानाची लोंबी भरणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सदर पडलेल्या धानाचे सर्वेक्षण इसापूर गावी सुरू झाले असून शेतीवर जाऊन कृषी सहाय्यक खंडाईत, तलाठी निमकर, ग्रामसेवक व्ही. एस. श्रीवास्तव, कृषी मित्र संतोष रोकडे हे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करून सर्वेक्षण करीत आहेत.