14 ऑगस्ट नंतर प्रथमच पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 20;आज 87 रुग्णांना डिस्चार्ज

0
403

भंडारा दि. 26 : जिल्ह्यात 14 ऑगस्ट नंतर प्रथमच आज पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 20 आली आहे. 14 ऑगस्ट रोजी 13 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांनतर रुग्ण संख्या वाढतीच राहली. आज प्रथमच ती 20 आली आहे.

जिल्ह्यात आज 87 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6999 झाली असून आज 20 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8074 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.68 टक्के आहे.

            आज 345 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 20 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 65 हजार 557 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 8074 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

            जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 10, मोहाडी 00, तुमसर 02, पवनी 01, लाखनी 03, साकोली 03 व लाखांदुर तालुक्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 6999 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 8074 झाली असून 873 क्रियाशील रुग्ण आहेत. आज 01 कोरोना रुग्णांचा मृत्यू असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची एकूण संख्या 202 झाली आहे.

            रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.68 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.50 टक्के एवढा आहे.

नागरीकांना आवाहन

  • कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
  • साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.

साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.