
गोरेगाव,दि.29ः-गोरेगाव येथे आरोग्य भारतीच्या झालेल्या सभेत गोरेगाव तालुका आरोग्य भारतीची कार्यकारीणी गठित करण्यात आली.यामध्ये तालुकाध्यक्ष पदावर डाॅ.हितेशकुमार पारधी तर सचिव पदावर डाॅ.विवेक देशमुख यांची निवड करण्यात आली.या बैठकीला आरोग्य भारतीचे विदर्भ उपाध्यक्ष डाॅ.प्रशांत कटरे,मिलिंग ढगे,दलजित खालसा,शाम चंदनकर,पुष्कर बारापात्रे,निलम खालसा व जय चौरसिया आदी उपस्थित होते.कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष डाॅ.नारायण पटले,कोषाध्यक्ष डाॅ.योगेश गोधुले यांची तर सदस्यामध्ये डाॅ.देवा कटरे,डाॅ.स्वाती पारधी,डाॅ.सतिश येळे,डाॅ.संगिता देशमुख,डाॅ.सतिश हटवार,डाॅ.देवेंद्र भगत व राजेश बिसेन यांचा समावेश आहे.