देसाईगंज/गडचिरोली,दि.२९=तीस वर्षापुरर्वी अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयाने पारित केलेल्या आदेशाला वरिष्ठ न्यायालयात स्थगीती अथवा आवाहन दिले नसतांना अधिकार अभिलेख पंजी नुसार ताबा व वहिवाटीत असलेल्या शेत जमिनीच्या क्षेत्राची व नावात दुरुस्ती करण्याबाबत देसाईगंज महसुल विभाग टाळाटाळ करित असल्याने राकेश मारोती राखडे या शेतकय्राला ता २७ ऑक्टोंबर ला ११ वाजता पासुन उप विभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. आज उपोषणाचा तिसरा दिवस होता. या उपोषणाची दखल घेऊन उप विभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन अधिक्षक भुमि अभिलेख यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावनी करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते राकेश राखडे यांनी आपले उपोषण मागे घेत असल्याचे कळविले आहे.
मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना १२ ऑक्टोंबर ला दिलेल्या लेखी निवेदनात अधिकार अभिलेख पंजी नुसार ताबा व वहिवाटीत असलेल्या शेत जमिनीच्या क्षेत्राची व नावात दुरुस्ती करण्याबाबत भुमि अभिलेख यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावनी न केल्यास दि २७ ऑक्टोंबर पासुन आमरण उपोषणाला बसणार असल्याचे कळविले होते. आज उपोषणाचा तिसरा दिवस होता. या आमरण उपोषणाची दखल घेऊन उप विभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन निवेदनातील नमुद अधिकार अभिलेख पंजी नुसार मौजा विर्शी तुकुम येथील सर्वे नं २३८ व २४०/२ (जुना) तर भुमापन क्रमांक ३७६ नविन मधील क्षेत्र १.०४ हे आर शेत जमिन वडीलोपार्जीत पासुन ते आता पर्यंत ताबा वहिवाटीत आहे या बाबतीत अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय यांनी क्षेत्राची व नकाशावर दुरुस्ती करण्याबाबत दि २७ मे १९८८ ला आदेश पारित केले होते. या आदेशाची अंमलबजावनी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करुन फेरफार करुन दिल्या जाईल असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेत असल्याचे राकेश राखडे यांनी सांगीतले.
उपविभागीय अधिकारीच्या आश्वासनानंतर राकेश राखडेचे उपोषण मागे
जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फेरफार करुन देणार