गडचिरोली दोन कोरोना बाधिताच्या मृत्यूसह 118 नवीन बाधित, तर 137 कोरोनामुक्त

0
107

गडचिरोली,दि.29: कोरोनामुळे दोन मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5651 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4709 वर पोहचली. तसेच सद्या 885 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 57 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यूमध्ये नवेगाव कॉम्पलेक्स, गडचिरोली येथील 84 वर्षीय महिला हायपरटेंशनची रुग्ण असून दुसरी 70 वर्षीय महिला व्याहड सावली येथील असून ती सुद्धा हायपरटेंशन आजाराने ग्रस्त होती. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.33 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 15.66 टक्के तर मृत्यू दर 1.01 टक्के झाला.

नवीन 118 बाधितांमध्ये गडचिरोली 46, अहेरी 10, आरमोरी 4, भामरागड 23, चामोर्शी 6, धानोरा 4, एटापल्ली 3, कोरची 0, कुरखेडा 3, मुलचेरा 2, सिरोंचा 4 व वडसा येथील 5 जणाचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 137 रूग्णांमध्ये गडचिरोली 51, अहेरी 28, आरमोरी 5, भामरागड 3, चामोर्शी 17, धानोरा 2, एटापल्ली 2, मुलचेरा 9, सिरोंचा 2, कोरची 7, कुरखेडा 7 व वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये श्रीरामनगर येथील 1, स्थानिक 3, गोंडवाना युनिर्व्हसिटीच्या जवळ 3, कॅम्प एरिया 6, बसेरा कॉलनी 2, टी पॉईंट 1, गोकुलनगर 5, कलेक्टर कॉलनी 1, कोटगल 1, साईनगर 2, महिला महाविद्यालयाच्या जवळ 1, मेडिकल कॉलनी 1, रामनगर 1, रेव्हेन्यु कॉलनी 2, स्नेहानगर 1, रामपुरी वार्ड 2, आयटीआय होस्टेल 1, आरमोरी रोड 1, पोलीस कॉलनी 1, विसापुर 1, साई ट्रॅव्हल्स जवळ 1, पोटेगाव 1, नवेगाव कॉम्पलेक्स 1, अयोध्यानगर 1, आशिर्वाद नगर 1, केमिस्ट भवन 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 9, एसडीएच 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये डोंगरगाव 2, स्थानिक 2, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 23, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये क्रिष्ण नगर 2, जयनगर 1, सोनापूर 1, आष्टी 2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये येरकड 1, स्थानिक 2, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, अंगारा 2, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, गोविंदपुर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये अंकिसा येथील 4, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये टीएचओ कार्यालयामधील 1, कस्तुरबा वार्ड 1, गांधी वार्ड 2, कोरेगाव 1,
तसेच इतर तालुक्यातील बाधितामध्ये 3 जणांचा समावेश आहे.