ककोडी,दि.30ः देवरी तालुक्यातील ककोडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान श्री सहस्त्रबाहु अर्जून यांची पुजा अर्चना करुन सर्ववर्गीय कलार समाजाच्यावतीने कोजागिरी कार्यकम करण्यात आला.यावेळी कोवीड-19 च्या नियमांचे पालन करीत पदाधिकारी व समाजातील वरिष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. ककोडी कलार समाजाचे अध्यक्ष विनोद सुरसावंत, उपाध्यक्ष सुखराम गहाणे, सचिव मोनू मोहबंशी, कोषाध्यक्ष मनोज बनसोड, समाजातील वरिष्ठ नागरिक श्रीराम नादनंकर त्रुशी बनसोड, रामचंद दरवडे, वासुजी मेश्राम यावेळी उपस्थित होते.