संजीवनी फाउंडेशनच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी भीष्म लांडगे

0
115

लाखनी,दि.02ः- महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय चळवळीचे मुक्त व्यासपीठ असलेल्या संजीवनी फाउंडेशनच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी भीष्म बाळाजी लांडगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी त्यांना निवड पत्र प्राप्त झाले. भीष्म लांडगे यांचे क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्य लक्षात घेता संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर वसंतराव सानप यांनी ही निवड केली आहे. संपूर्ण संजीवनी फाउंडेशन परिवाराने तसेच मित्रपरिवाराने भीष्मचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, समाजातील इतर युवकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करुन विधायक कामे करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे भीष्म लांडगे यांनी सांगितले.