दोन मृत्यूंसह आज 92 नवीन कोरोना बाधित, तर 88 कोरोनामुक्त

0
34

गडचिरोली,दि.05 : कोरोनाचे जिल्हयात 92 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 88 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6324 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5345 वर पोहचली. तसेच सद्या 917 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 62 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यूमध्ये आरमोरी मोहझरी येथील दोघांचा यात 23 वर्षीय युवकाचा व 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.52 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.50 टक्के तर मृत्यू दर 0.98 टक्के झाला.
नवीन 92 बाधितांमध्ये गडचिरोली 29, अहेरी 6, आरमोरी 10, भामरागड 2, चामोर्शी 8, धानोरा 2, एटापल्ली 12, कोरची 3, कुरखेडा 4, मुलचेरा 0, सिरोंचा 9 व वडसा येथील 7 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 88 रूग्णांमध्ये गडचिरोली 31, अहेरी 16, आरमोरी 6, भामरागड 1, चामोर्शी 10, धानोरा 1, एटापल्ली 3, मुलचेरा 1, सिरोंचा 2, कोरची 0 व कुरखेडा 3, व वडसा मधील 14 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील कोटगुल 1, साईनगर 6, इंदिरानगर 1, कन्नमवार वार्ड 3, गोकुलनगर 1, विसापुर हेटी 1, मेडिकल कॉलनी 1, टेंभा 1, नवेगाव कॉम्पलेक्स 3, बोदली 1, कोटगल 1, फुले वार्ड 1, आशिर्वाद 1, गांधी वार्ड 1, स्थानिक 2, कॅम्प एरिया 1, वनश्री कॉलनी 1, वसा 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, स्थानिक 2, सीआरपीएफ बटालियन मधील 1, करमपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये देऊळगांव 1, मोहझरी 1, स्थानिक 6, वैरागड 1, किटाडी ट्रेनिंग सेंटर (पोलीस)1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये कुक्कामेटा 1, स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितातध्ये स्थानिक 3, हनुमान वार्ड 1, राममोहनपुर 1, वायगांव 1, आष्टी 1, हनुमाननगर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 6, अलदांडी 3, हालेवारा 2, इंदिरा वार्ड 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये टेंबली 1, भिमपुर 1, कोटगुल 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, अंगारा 3, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये रायपेठा 1, स्थानिक 6, रंगाय्यापल्ली 1, वियामपल्ली 1 व वडसा तालुक्यातील बाधीतामध्ये आयडीबीआय बँक कुरुड जवळ 1, जवाहर वार्ड 2, कोरेगाव 2, अरततोंडीजवळ 1, विसोरा 1, यांचा समावेश आहे. तसेच इतर जिल्ह्यातील 1 जणाचा समावेश आहे.