
अंजनसिंगी’-: मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 52 वाँ पुण्यतिथी महोत्सव कोरोना काळात सरकारने दिलेल्या नियमाचे पालन करून तसेच अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम यांनी दिलेल्या सूचनेनुसार योग्य सामाजिक अंतर ठेवून श्रीगुरुदेव सेवा मंडळ कावली यांनी साजरा केला आहे. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे युवा कार्यकर्ते ग्रामगीताचार्य निलेश मोहकार यांच्या मार्गदर्शनाखाली कावली येथिल श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सान स्वयंसेवक ज्ञानदीप ठाकरे, हिमांशु भोंगाडे यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची वेशभूषा साकारून समाज प्रबोधन केले.यामद्ये राष्ट्रसंताच्या वेशभूषेतुन श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्य,मानवता,राष्ट्रभावना, संघटन शक्ती,ग्रामस्वराज्य इत्यादी विचार तसेच वैराग्यमुर्ती गाडगेबाबा यांच्या वेशभूषेतुन दशसूत्री,ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, शिक्षण या विषयावर प्रबोधन केले.
वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव विविध उपक्रमाचे आयोजन करून कावली ग्रामात साजरा होत आहे. यामद्ये ऑनलाईन ग्रामगीता पारायण, फिरते वाचनालय,वेशभूषेतून समाजप्रबोन,दिपासन,लाठी-काठी,वक्तृत्व, इत्यादी उपक्रम. तन्मय झाडे, पुजा काळे यांनी दिपासन करून वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन केले. तर सुहाना भोंगाडे व अनुष्का भोंगाडे यांनी आपल्या घरी राहूनच आपल्या वक्तृत्वातून संत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या लहरकी बरखा या साहित्यातील निवडक श्लोक अंतरा झाडे, ईश्र्वरी भोंगाडे यांनी म्हणून दाखविले. तर आर्यन करपती,क्रिश जोगे यांनी लाठी-काठीचे प्रात्यक्षिक आपल्या घरूनच करून दाखविले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेशराव ठाकरे गुरुजी, निलेश मोहकार,विनोदराव मानकर,अनिल इंगळे, अशोकराव तितरे,दिगांबर हिवसे,रमेश बा. ठाकरे, कीर्ती पिंपळे, मयुरी पखान व श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले आहे.