गोंदिया- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमीत्त आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्र, समता सैनिक दल व संविधान मैत्री संघ यांच्या संयुक्त वतीने आयोजित स्थानीक कुंभारे नगर येथील संस्कार केंद्र येथे सुरक्षा नियमांचे पालन करित विद्यार्थी सोबतीनी बोधपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या अंतर्गत विद्यार्थ्यानी बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश दिनापासुन ते शैक्षणिक जिवन प्रसंगावर वक्तव्य व प्रश्नमंजूषा, वंदन-जागृती गीत, रंगोली सजावट कार्यक्रम प्रस्तुत केले. कार्यक्रम प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करुन माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्र संचालक महेंद्र कठाने, केंद्र प्रशिक्षक व पूर्व सीनियर सेक्शन इंजिनीयर (रेल्वे) माणिक गोंडाने, समता सैनिक दल कमांडर राजहंस चौरे, संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे प्रामुख्याने उपस्थीत होते. उपस्थीत मान्यवरानी “जरी बाबासाहेब विश्वात ज्ञानाचे प्रतिक, संविधान निर्माते म्हणून ओळखले जातात तरी ते स्वत:ला नेहमी विद्यार्थीच समजुन घेत जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ज्ञानार्जन करित राहिले. विद्यार्थ्यानी बाबासाहेब यांचा आदर्श घ्यावा.” असा मोलाचा संदेश दिला.
विद्यार्थी- आदित्य कठाने, नंदिनी बनसोड, मानव कठाने, श्रेया देशभ्रतार, आर्यन बनसोड, पन्खुडी बोरकर, श्रावणी पानतोने, हर्शित गजभिये, रिया बनसोड, आंचल रामटेके, यश देशभ्रतार, युवराज गौतम, अंगद भालाधरे, यानी कार्यक्रम यशस्वीतेकरीता अथक प्रयत्न केले. संचालन कु.शिमोन भालाधरे या विद्यार्थिनी ने केले.