जिप.पं.स. सुधारीत प्रभाग रचना बाबत 27 पर्यंत हरकती स्विकारल्या जातील

0
151

भंडारा दि.11: भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक 2020 संबंधाने जिल्हयाची निवडणूक विभागात विभागणी तसेच निर्वाचक गणामध्ये विभागणी, आरक्षण व क्षेत्राची व्याप्ती दर्शविणारी अधिसूचना आज दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा येथील नोटीस बोर्डावर, सर्व तहसिल कार्यालयाचे नोटीस बोर्डावर, सर्व पंचायत समित्यांचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सुचना असल्यास त्या संबंधीची जी सकारण लेखी निवेदने जिल्हाधिकारी, भंडारा यांचेकडे दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत पोहचतील ती निवेदने/हरकती वा सुचना विचारात घेतले जाईल . उपरोक्त तारखेनंतर जिल्हाधिकारी यांचेकडे आलेले निवेदन/हरकती वा सुचना विचारात घेतले जाणार नाही . वरील कालावधीत प्राप्त होणा – या हरकती व सुचनांवर विभागीय आयुक्त, नागपुर विभाग, नागपुर किंवा ते ज्या अधिकाऱ्यास अधिकार प्रदान करतील अशा अधिकाऱ्याव्दारे दिनांक 27 नोव्हेंबर 2020 पर्यंत सुनावणी देऊन निर्णय देण्यात येईल.