दिवाळीनिमित्त होणारे सांस्कृतिक उत्सव सुरू करा-मंजुषाताई वासनिक

0
118

देवरी:-ग्रामीण भागात कोरोना संकट आल्याने दिवाळीनिमित्त होणारे मंडई, उत्सव, तमाशा, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार का असा प्रश्न सर्वांना निर्माण पडला आहे. हि परंपरा कायम रहावी म्हणून यासाठी सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष मंजुषा वासनिक यांनी शासनाकडे केली आहे.
दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दिवासात ग्रामीण भागात मंडई उत्सवाला सुरुवात होते. त्याचबरोबर मंडई निमित्त लग्न जुळण्याचे योग सुध्दा येतात. यानिमित्त मंडई उत्सवाची हौस पूर्ण व्हावी म्हणून घरोघरी पाहुण्यांची गर्दी दिसते. ग्रामीण भागात दडांर, नाटक, तमाशा व इतर कार्यक्रम होतात. या सर्व कार्यक्रमांना परवानगी मिळावी म्हणून शासनाला विनंती केली आहे.
कोरोना मुळे ग्रामीण भागातील लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मंडळीला तसेच सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी अशी कळकळीची विनंती सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष मंजुषा ताई वासनिक यांनी शासनाकडे केली आहे.