अर्जुनी मोर. :- अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला ,रमाई आवास योजनेचा निधी गोंदिया जिल्ह्यात त्वरीत उपलब्ध करून द्यावा असी मागणी अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मंत्रालयात जावून सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांची भेट घेवुन परस्पर चर्चा केली. गोंदिया जिल्हा हा आदिवासी नक्षलप्रभावीत असुन मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती ची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. रमाई आवास योजनेचे माध्यमातून अनेकांना घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. अनेक लोकांचे घरकुलाचे बांधकाम पूर्णत्वास जात असुन बरेचसे बांधकाम निधी अभावी अर्धवट आहेत.जिल्ह्यातील नागरीकांची परिस्थिती हालाखीची असल्याने निधीअभावी बांधकाम रखडले आहे. तर घरकुल बांधकामाला लागणारा मटेरियल दुकानदार उधार देत नाही.तर काहींनी उधारी घेतले तर दुकानदाराचा उधारी वसुलीचा तगादा वाढला आहे. ही सर्व भुमिका आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी राज्याचे प्रधान सचिव शाम तागडे यांना प्रत्यक्ष भेटुन सांगितली. चर्चेचे वेळी राजु कारेमोरे सुध्दा उपस्थित होते.