बोनससाठी लिथो प्रेस कामगारांचे आंदोलन

0
188

गोंदिया ता.१२: येथील लिथो प्रेस कामगार संघटनेच्या वतीने बोनस मिळावा, या मुख्य मागणीला घेवून आज (ता.१२) रेलटोली स्थित कार्यालयासमोर आंदोलन केले.
मे.वसंत फाईन आर्ट लिथो वर्कस् येथे कामगारांना प्रत्येक वर्षी बोनस देण्यात येते. सन २००९ च्या करारानुसार १६.६६ टक्के हा दर ठरविण्यात आला आहे. तसेच कामगारांना किमान वेतन कायदाही लागू आहे. सन २०१९ पर्यंत नियमित बोनस देण्यात आला. मात्र, यंदा संचारबंदीच्या काळातही कामगारांनी इमानेइतबारे काम केले. त्यानंतरही त्यांना दिवाळी तोेंडावर असताना बोनस देण्यास नकार देण्यात आला. या मुख्य मागणीला घेवून आज (ता.१२) रेलटोली येथील कार्यालयासमोर लिथो प्रेस कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, या आंदोलनाची दखल इंटकचे विनोदभाऊ पटोले यांनी घेत या आंदोलनात सहभाग नोंदवून कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संपतराव वाढई, अजयसिंह चंदेल, जावेद शेख, अ‍ॅड.रईस खान, प्रकाश मेश्राम, रवि मेश्राम, सोमेश्वर टेंभरे, जियालाल कटरे, राजेश चावडा, ताराचंद नागरीकर, चैतराम पेशने, अविनाश पवार, सुरेश उके, श्रीराम टेंभरे आदि कामगार सहभागी झाले होते.