गडचिरोली एका मृत्यू, 120 कोरोनामुक्त तर 48 नवीन कोरोना बाधित

0
91

गडचिरोली,दि.13: आज एका मृत्यूसह जिल्हयात 48 नवीन बाधित आढळून आले. तर आज 120 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6781 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6144 वर पोहचली. तसेच सद्या 569 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 68 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यू मध्ये आरमोरी तालुक्यातील वसाला गावातील 44 वर्षीय पुरुष हायपरटेंशन तसेच मधुमेहाने ग्रस्त होता. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.61 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.39 टक्के तर मृत्यू दर 1.00 टक्के झाला.

नवीन 48 बाधितांमध्ये गडचिरोली 18, अहेरी 2, आरमोरी 5, भामरागड 3, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 1, कोरची 2, कुरखेडा 4, मुलचेरा 2, सिरोंचा 2 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 120 रूग्णांमध्ये गडचिरोली 58, अहेरी 14, आरमोरी 10, भामरागड 7, चामोर्शी 3, धानोरा 5, एटापल्ली 1, मुलचेरा 2, सिरोंचा 3 कोरची 4, कुरखेडा 10 व वडसा मधील 3 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील सोनापूर कॉम्पलेक्स 1, रामनगर 1, गोंडवाना युनिर्व्हसिटीजवळ 1, मडा कॉलनी 1, रेड्डी गोडावून 1, लांजेडा 2, नवेगाव 1, दुर्गा माता मंदिरजवळ 1, गोकुलनगर 1, स्थानिक 1, टी पाँईट चौक 3, कारमेर शाळेजवळ 1, माता मंदिर जवळ 1, टिचर कॉलनी अयोध्यानगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, स्थानिक 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, पिंपळगाव 1, वाघाडा 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये नरगुंडा 1, मिरगुडवंचा 1, स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आमगाव 1, सिंगनपल्ली 1, खारडा 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सालेभट्टी 1, स्थानिक 1 (आरएच), एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये चिरचली 2, स्थानिक 1, श्रीरामनगर 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विवेकनंदपुर 2, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, मेडराम 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कोरेगाव 2, कुरुड 1, शिवाजी वार्ड 1, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील 1 जणाचा समावेश आहे.