गडचिरोली ९० कोरोनामुक्त तर 62 नवीन कोरोना बाधित

0
1361

गडचिरोली,(जिमाका)दि.14*: आज जिल्हयात 62 नवीन बाधित आढळून आले. तर आज 90 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6843 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6234 वर पोहचली. तसेच सद्या 541 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 68 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.10 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 7.91 टक्के तर मृत्यू दर 0.99 टक्के झाला.

नवीन 62 बाधितांमध्ये गडचिरोली 20, अहेरी 22, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 1, धानोरा 9, एटापल्ली 5, कोरची 1, कुरखेडा 1, मुलचेरा 2, सिरोंचा 0 व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 90 रूग्णांमध्ये गडचिरोली 29, अहेरी 6, आरमोरी 9, भामरागड 2, चामोर्शी 7, धानोरा 2, एटापल्ली 12, मुलचेरा 0, सिरोंचा 9 कोरची 3, कुरखेडा 4 व वडसा मधील 7 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील साईनगर 1, पोटेगाव 1, चामोर्शी रोड 1, गोकुलनगर 2, टी पॉईट चौक 1, स्थानिक 2, बामणी 1, सोनापुर कॉम्पलेक्स 2, डोंगरगाव 1, नवेगाव कॉम्पलेक्स 1, शाहुनगर 1, धनवंती हॉस्पीटल 1, कजाजनगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये सिंगालपल्ली 2, वेलगुर 1, स्थानिक 10, वीर बाबुराव चौक 1, आलापल्ली 5, कमलापुर 1, नागेपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये भाडभिडी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये उदयनगर 1, विवेकनंदपुर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये भगतसिंग वार्ड 1, असा समावेश आहे. तसेच इतर राज्यातील 12 यामध्ये (9 सीआरपीएफ जवान धानोरा येथील तर 3 सीआरपीएफ जवान गडचिरोली येथील आहे). आणखी 3 इतर राज्यातील यामध्ये एटापल्ली कोटमी येथील बाधित आहेत. असे एकूण इतर राज्यातील यामध्ये 15 जणांचा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील 1 जणाचा समावेश आहे.