मंत्री एकनाथ शिंदेनी केली पोलिसांसोबत दिवाळी साजरी

0
315

गडचिरोली:-राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज  पोलीस मदत केंद्र येलचिल येथे पोचून पोलीस जवानांसोबत दिवाळी उत्सव साजरा केला.पोेलीस जवान आणि त्यांच्या कुटुंबियाना मिटाईचे वाटप करुन दिवाळी साजरी केली.

नक्षलवाद हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळी निमित्य भेट देऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस जवानांचे कौतुक केले.
पालकमंत्री शिंदे यांनी भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही.गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पोलीस घरापासून आपल्या आई-वडिलांनपासून,भावंडापासून,पत्नी-मुलं बाळा पासून दूर असाल याची मला जाणीव आहे त्याकरीत मी तुमचं मनोबल वाढवण्यासाठी इथे आलेलो आहे असे  म्हणाले..

या कार्यक्रमप्रसंगी पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील ,पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.