गोरेगाव=दिवाळी सणाला फार महत्व आहे. गरीब असो की श्रीमंत आपआपल्या परीने दिवाळी सण साजरा करतात. परंतु, गोरगरीब मुलांसोबत सण साजरा करून त्यांचा आनंद व्दिगुणीत करण्याच्या उद्देशाने गोरेगावचे नगराध्यक्ष आशिष बारेवार मागील सहा वर्षांपासून चंद्रपूरटोली येथील गरीब मुलांना भेटवस्तू वाटप करून दिवाळी सण साजरा करीत आहेत. त्यांच्या या कायार्चे नगरात कौतुक केले जात आहे.
दिवाळी हा आनंदाचा सण दिवाळीत नवे कपडे, मिठाई, फटाके फोडल्या शिवाय दिवाळी कुठेच साजरी होऊ शकत नाही. फटाके वातावरणाला घातक असले तरी अजूनही समाजात त्याचे भय नाही. कारण वातावरण प्रदुषित करण्यामागे ईतर अनेक बाबीही जबाबदार आहे हे विसरून चालणार नाही. बरे असो, दिवाळी हा सण सगळीकडे आनंदात साजरा व्हावा ही सगळ्यांचीच ईच्छा असते. पण अनेक वेळा प्रश्न निर्माण होतो तो पैशाचा कुणाकडे साधे जेवायलाही पैसे नाही. तर कुणाचा पैसा स्वत:च्या मौजमजा करण्यात उडण्यात जातो. पण आमच्या गोरेगाव नगरातील एक सामाजिक कायार्चा वसा घेऊन काम करणारा एक इंजिनिअर आशिष बारेवार यांनी मागील सहा वर्षांपासून गोरेगाव च्या चंद्रपूर टोलीवर गरीब मुलांना चांगले कपडे, मिठाई, फटाके व ईतर अनेक भेटवस्तू देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आपला आनंद साजरा करत आहे. आशिष बारेवार हे गेल्या अडीच वर्षात नगर उपाध्यक्ष तर या अडीच वषार्साठी नगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. या पदाच्या मानधनाचा उपयोग त्यांनी गोरगरीबांचे अर्शू पूसण्यासाठीच केला हज येथे उल्लेखनीय आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच १४ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजता चंद्रपूर टोलीवर हा कार्यक्रम घेण्यात आला. दिवाळीच्या निमित्ताने अनेक नवयुवक आपला वेळ चंद्रपूर टोलीवर दिवाळी साजरी करतात. बँड पथकासह येथे भेटवस्तूचे वाटप करून दिवाळी गेल्या सहा वर्षांपासून साजरी केली जात आहे. या कार्यात नगरातील नवयुवक विकास बारेवार, नितीन बारेवार, संजय घासले, अनिल राऊत, साकेत पालेवार, अमोल भेड.ारकर, निलेश भड, यश कुंडजवार, रवि ठाकूर, धर्मेंद्र राऊत, नितिन कांबळे, भानु हरिणखेडे, मनोज मेर्शाम, पंकज बुरडे, नंदकिशोर मेर्शाम आदि प्रामुख्याने उपस्थित होते.