चंद्रपूर,दि.21ः- ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात ओबीसी समाजातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या संदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षकांनी आढावा घेतला असून समन्वय समितीला विविध सूचनाही केल्या आहेत.
या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आश्वासन बैठकीदरम्यान, समन्वय समितीने दिले. २६ नोव्हेंबरला चंद्रपुरात आयोजित या मोर्चामध्ये शहरासह जिल्ह्यातील कानाकोपर्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. त्यामुळे पोलीस विभागाकडून या मोचार्संदर्भात माहिती घेण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक शिलवंत नांदेडकर यांची उपस्थिती होती. यावेळी मोर्चा प्रारंभस्थळ व समारोप स्थळासंदर्भात माहिती देण्यात आली. येणार्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मोर्चाचा मार्ग, मोर्चा नियंत्रणासाठी व्हॉलेंटियर्स, मार्गातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्पीकर व्यवस्था, मोर्चाचा समारोप या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पोलिस विभागाकडून कोविड आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन समन्वय समितीच्यावतीने देण्यात आले. यावेळी समन्वय समितीच्यावतीने बळीराज धोटे, अँड. पुरुषोत्तम सातपुते, अँड. दत्ता हजारे, अँड. फरहाज बेग, डॉ. सुरेश महाकुलकर, डॉ. राकेश गावतुरे, प्रा. विजय बदखल, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. माधव गुरुनुले, डॉ. सिराज खान, अँड. प्रशांत सोनुले, विवेक बोरीकर आदी सहभागी झाले होते. बैठकीला शहर, रामनगर स्टेशनचे ठाणेदार आणि अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.