वंचित बहुजन आघाडी लढविणार निवडणुका

0
296

अर्जुनी-मोर,दि.21ः आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये  अर्जुनी-मोर तालुक्यातील सर्व जागा वंचित बहुजन आघाडी पक्ष लढविणार असल्याचे तालुकाध्यक्ष उदाराम मुंगमोडे यांनी जाहीर केले आहे. .. तालुक्यात जवळपास 33 ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतींचा कार्यकाढ संपलेला असून सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणूका वंचित बहुजन आघाडी लढविणार आहे. तसेच अर्जुनी-मोर पंचायत समिती निवडणूक 14 उमेदवार रिंगणात वंचित बहुजन आघाडी उतरविणार आहे तसेच अर्जुनी-मोर नगरपंचायत च्या सर्व अपघात उमेदवारी लढविणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या अर्जुनी-मोर तालुक्यातील सात जागा असून त्यासुद्धा वंचित बहुजन आघाडी लढविणार आहे.  उपेक्षित व राजकारणात वंचित ठरलेल्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी उमेदवारी देईल असे त्यांनी सांगितले.