मेट्रो रेल्वे उड्डाण पुलावरून धावणार

0
22

नागपूर दि.१७: उत्तर-दक्षिण मार्गावर अजनी चौक ते हॉटेल प्राईडपर्यंत मेट्रो रेल्वे उड्डाण पुलावरून धावणार आहे. उड्डाण पूल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) बांधणार असून त्यावर कंपनी मेट्रो रेल्वेसाठी बांधकाम करणार असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

अजनी ते प्राईड हॉटेल हा ३.५ कि़मी.चा मार्ग आहे. यावर मेट्रो रेल्वेचे पाच स्टेशन राहणार आहे. नवीन बांधकामासाठी छत्रपती चौकातील उड्डाण पूल तोडण्यात येणार आहे. त्याऐवजी चार पदरी रस्ता, उड्डाण पूल आणि त्यावर मेट्रो रेल्वे धावणार आहे. मेट्रो रेल्वेसाठी ‘एनएमआरसीएल’चे स्वतंत्र बांधकाम राहील. त्यासाठी डिटेल डिझाईन कन्सलटंटची (डीडीएस) नियुक्ती करण्यात येणार आहे. शिवाय मुंजे चौक ते खापरीपर्यंत ७.५ कि़मी.चे डिझाईन आणि बांधकामासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन टप्प्यातील निविदांंपैकी एका टप्पा उघडण्यात आला आहे. त्याचे मूल्यांकन सुरू आहे. दुसरा टप्प्यातील निविदा आॅक्टोबरमध्ये काढण्यात येणार आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या सात निविदा प्रक्रियेपैकी ही एक प्रक्रिया आहे. या मार्गावर खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट, उज्ज्वलनगर, जयप्रकाशनगर, छत्रपती चौक, अजनी, रहाटे कॉलनी, काँग्रेसनगर असे नऊ स्टेशन राहतील, असे दीक्षित म्हणाले.