आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे स्थलांतरण थांबवा

0
16

भंडारा,दि.२०, येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेवून आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचा कट ठेवल्याचा आरोप करुन शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आदिवासी विद्यार्थी संघटनेच्यावतीने निवेदन देवून स्थलांतरण न करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेश मरस्कोल्हे, विजय नैताम, विकास मरस्कोल्हे, सुधाकर कोडवते, वनमाला उईके, दुर्गामरस्कोल्हे, हिना मडावी, अशोक उईके, लक्ष्मीकांत सलामे, मुकेश भलावी उपस्थित होते.जिल्ह्यातील आदिवासींना शासनाच्या जीवनोपयोगी योजनेपासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न चालला असल्याने आदिवासी बांधव शासनाचा निषेध करणार असल्याचा इशारा आदिवासी विद्यार्थीसंघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकास करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावे याकरिता आघाडी शासनाने १८ जून २0१२ रोजी आदेश पारित करुन गोंदिया व भंडारा जिल्हयाचे संयुक्त देवरी येथील कार्यालयाचे विभाजन करुन भंडारा मुख्यालयी आदिवासी प्रकल्प कार्यालय स्वतंत्रपणे सुरु करण्यात आले होते. भंडारा येथील प्रकल्प कार्यालय पुर्वीप्रमाणेच गोंदिया जिल्हयातील देवरी येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शासनाच्या या निर्णयामुळे आदिवासी बांधवाना १५0 किमीचा अंतर कापावे लागणार आहे.