41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ कृषी योजनांच्या लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

कृषी योजनांच्या लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

0
69

blank

भंडारा, दि. 23 : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनेंतर्गत विविध कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, योजनेचा लघुसंदेश प्राप्त झालेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज करताना सामूहिक सेवा केंद्राची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            या सुविधेंतर्गत लाभार्थींनी नावाची एकदाच नोंदणी करणे आवश्यक असून, एकाच अर्जाद्वारे विविध योजनांचा त्यांना लाभ घेता येणार आहे. ही योजना 2020-21 मध्ये कार्यान्वित झाली असून, कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची 11 जानेवारी ही अंतिम मुदत होती. त्यानुसार प्राप्त अर्जांची लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली.

            यामध्ये प्राधान्याने कृषी यांत्रिकीकरण, अनुसूचित जाती, जमातीसाठी नवीन विहीर, कांदाचाळ, प्लॅस्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन आदी योजनांचा समावेश आहे. त्यामुळे निवड झालेल्या आणि त्याबाबतचा लघु संदेश प्राप्त लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर जावून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.