
वाशीम : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या संकल्पनेतून तथा भूमिपुत्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा विभाग प्रमुख प्रा. भास्करराव बेंगाळ द्वारा आयोजित महिलांसाठी राज्य स्तरीय ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या तथा सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने आयोजित वत्कृत्व स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पाच हजार, द्वितीय पारितोषिक तीन हजार तृतीय पारितोषिक दोन हजार रोख व प्रमाणपत्र असेल, तसेच उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना सर्वाधिक लाईक्स व व्हिव साठी अकराशे रूपये रोख व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी खालील पैकी एका विषयावर पाच मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून
७९७२६८१५९५ या क्रमांकावर पाठवावा. स्पर्ध्येचे विषय १) स्त्री म्हणून वेगळं जगायचंय मला, २) आणखी किती निर्भया ?, ३)प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, ४)इतिहासातील स्त्री आणि आजची स्त्री, ५) महिलांना आरक्षण नको तर संरक्षण हवे. ६)खरचं स्त्री पुरुष समानता आहे ?, ७) आता रडायचं नाही तर लढायचं आहे, ८) स्त्री म्हणजे काय ?, ९)भारतीय शेतीतील महीलांचे योगदान, १०) कुटूंब प्रमुख म्हणून स्त्रीयांचे योगदान, ११) कुटुंबातील आरोग्य आणि शिक्षण यातील महिलांचे योगदान. १२) स्त्री चे मानवी समाजातील स्थान
स्पर्धेचे नियम : हि स्पर्धा केवळ महिला व विद्यार्थिनींसाठीच असेल, वयाची कुठलीच अट नाही, एका स्पर्धकाला एकच विषय मांडता येईल, प्रत्येक स्पर्धकाने पाच मीनटा पर्यंतचा आपल्या वत्कृतत्वाचा व्हिडीओ काढुन पाठवावा, स्पर्धेकरिता मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा निवडता येईल, स्पर्धकांनी आपला व्हिडीओ २५ मार्च सायंकाळी ५ पर्य॔त आपले व्हिडीओ पाठवावा, स्पर्धेचा निकाल ३१ मार्च पर्यंत जाहीर केला जाईल, स्पर्ध्येत सहभागी सर्व स्पर्धकांचे व्हिडीओ भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या यु ट्युब चॅनल वर प्रदर्शित केले जातील
या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी आपले व्हिडीओ पाठवावेत असे आवाहन भूमिपुत्रचे यवतमाळ जिल्हा प्रवक्ता प्रीतम सरग (७९७२६८१५९५), वाशीम सो. मीडिया अध्यक्ष पवन खोंडकर(७२१८६२३८४३), युवक जिल्हा उपाध्यक्ष रवी पाटील जाधव (८४८३८८२६१०) यांनी केले आहे.